 
						Batliboi Share Price Today | ‘बाटलीबोई लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षापासून जबरदस्त वेगात वाढत आहेत. ‘बाटलीबोई लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 6 रुपयांवरून वाढून 71.50 रुपयांवर पोहचले आहे. (Batliboi Limited)
आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के घसरणीसह 71.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘बाटलीबोई लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 74.20 रुपये होती. बाटलीबोई लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी कंपन्यांपैकी एक असून तिची स्थापना 1892 साली करण्यात आली होती.
3 एप्रिल 2020 रोजी ‘बाटलीबोई लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 6.50 रुपयेवी ट्रेड करत होते. 25 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 73.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 वर्षात ‘बाटलीबोई लिमिटेड’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1013 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी बाटलीबोई लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.43 लाख रुपये झाले असते.
सहा महिन्यांत दिला 89.40 टक्के परतावा :
मागील 6 महिन्यांत ‘बाटलीबोई लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 89.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 37.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 73.40 रूपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 28 रुपये होती.
या वर्षी आतापर्यंत बाटलीबोई लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 53 टक्के परतावा मिळवून दिला आहे. बाटलीबोई लिमिटेड ही कंपनी मुख्यतः मशीन टूल्स, टेक्सटाईल एअर इंजिनीअरिंग, टेक्सटाईल मशिनरी, एअर कंडिशनिंग, एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग, पवन ऊर्जा या क्षेत्रात व्यवसाय करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		