19 May 2024 8:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Saksoft Share Price Today | या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट केले, झटपट पैसे वाढवण्यासाठी स्टॉक सेव्ह करा

Saksoft Share Price

Saksoft Share Price Today | मागील सहा महिन्यापासून सॅकसॉफ्ट कंपनीचे शेअर्स वेगात धावत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच 244.70 रुपये ही आपली नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के घसरणीसह 212.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 16.85 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यात सॅकसॉफ्ट कंपनीच्या गुंतवणूकदारांनी जबरदस्त परतावा कमावला आहे.

Saksoft Limited Stock Price Today on NSE & BSE

गुंतवणुकीवर दुप्पट परतावा :
2023 या वर्षात सॅकसॉफ्ट कंपनीच्या शेअरची दुप्पट वाढली आहे. सॅकसॉफ्ट कंपनी मुख्यतः फिनटेक, ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक्स, टेलिकॉम आणि युटिलिटीज, रिटेल ईकॉमर्स, हेल्थकेअर ग्राहकांसाठी जगभरात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचे काम करते.

सॅकसॉफ्ट कंपनी आपल्या ग्राहकांना माहिती व्यवस्थापन आणि बिझनेस इंटेलिजन्स सोल्यूशन्स, अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण आणि क्लाउड मोबिलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्सवर आधारित सोल्यूशन्स यासारख्या सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या क्षेत्रात आघाडीची कंपनी मानली जाते.

कंपनीची तिमाही कामगिरी :
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत सॅकसॉफ्ट कंपनीच्या महसूलात वार्षिक 41.7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. या कालावधीत कंपनीने 483.55 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी या कालावधीत कंपनीच्या नफ्यात 24.7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती.

आर्थिक वर्ष 22-23 मध्ये पहिल्या 9 महिन्यांत कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या एकूण महसुलापेक्षा जास्त महसूल संकलित केला आहे. सॅकसॉफ्ट कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत 37.9 टक्के वार्षिक वाढीसह आणि 4.8 टक्के तिमाही दर तिमाही वाढीसह 171.68 कोटी रुपये नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Saksoft Share Price Today on 27 April 2023.

हॅशटॅग्स

Saksoft Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x