
Rekha Jhunjhunwala Portfolio| शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील शेअर बाजारात आपली एक वेगळीच छाप सोडली आहे. यावर्षी फोर्ब्सच्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रेखा झुनझुनवाला यांचे नाव देखील सामील झाले आहे. 2023 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये देखील रेखा झुनझुनवाला यांनी स्थान मिळवले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर रेखा झुनझुनवाला हेच त्यांचा पोर्टफोलिओ ऑपरेट करत आहेत.
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे एकूण 5.1 अब्ज डॉलर्स ची संपत्ती आहे. राकेश झुनझुनवाला यांचे मागील वर्षी निधन झाले, आणि त्यांच्या अवाढव्य पोर्टफोलिओची जबाबदारी रेखा झुनझुनवाला यांच्या खांद्यावर आली. या पोर्टफोलिओमध्ये अनेक मौल्यवान कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील सर्वात मौल्यवान स्टॉक म्हणजे टाटा ग्रुप च्या मालकीच्या ‘टायटन’ कंपनीचा आहे. याशिवाय झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, कॅनरा बँक, टाटा मोटर्स, क्रिसिलसह 29 इतर कंपन्यांचे स्टॉक सामील आहेत.
NSE वरील लेटेस्ट डेटानुसार रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीच्या शेअरमधून अवघ्या 15 दिवसांत 1,000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. टायटन कंपनीमध्ये त्यांनी गुंतवणूक वाढवल्यामुळे हा फायदा त्यांना मिळाला. रेखा झुनझुनवाला यांनी मार्च 2023 तिमातीत टायटन कंपनीचे शेअर्स 10.50 लाख शेअर्स खरेदी केले होते. त्यांनी आपला गुंतवणूक हिस्सा 0.12 टक्क्यांनी वाढवला होता. आज गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 2,660.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
मागील काही महिन्यात रेखा झुनझुनवाला यांची निव्वळ संपत्ती गगनाला भिडली आहे. दक्षिण मुंबईमध्ये मलबार हिल्ससारख्या उच्चभ्रू परिसरात झुनझुनवाला कुटुंबाकडे 4500 स्क्वेअर फूटचा डुप्लेक्स फ्लॅट आहे. हा फ्लॅट राकेश झुनझुनवाला यांनी 25.25 कोटीला खरेदी केला होता. लोणावळ्यात त्यांचा 18,000 चौरस फुटांचा हॉलिडे होम असून त्यात सात बेडरूम, एक पुल, जकूझी, जिम आणि डिस्को देखो आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.