
Gold Price Today | सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,120 रुपयांवर पोहोचला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 60,600 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाला होता. चांदीचा दर देखील 440 रुपयांनी वाढून 75,340 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे. जो मागील सत्रात 75,340 रुपये प्रति किलोग्राम होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषकांनी सांगितले की, मुंबई, पुणे आणि नाशिक अशा महत्वाच्या सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 520 रुपयांनी वाढून 61,120 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तत्पूर्वी म्हणजे काल संपूर्ण आशियाई बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली होती.
24 कॅरेट सोन्याची किंमत
आयबीजेए अर्थात इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा बंद भाव 6052 रुपये प्रति ग्रॅम होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,250 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये आहे.
वायदा बाजारात सोन्याच्या दरात वाढ
आज वायदा बाजारातही सोनं 282 रुपयांनी वाढून 60,175 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचलं होतं. ट्रेडसच्या नव्या खरेदीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर अगदी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सुद्धा सोन्याचे दर 0.75 टक्क्याने वाढून 2,011 डॉलर प्रति औंस वर स्थिरावले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.