4 May 2024 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

KPIT Technologies Share Price Today | मजबूत तिमाही निकालाने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह, शेअरची किंमत तेजीत वाढतेय, स्टॉक खरेदी करावा?

KPIT Technologies Share Price

KPIT Technologies Share Price Today | मागील काही काळापासून ‘केपीआयटी टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरमध्ये चांगली वाढ पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहेत. मागील दोन दिवसात शेअर्सची किंमत 11 टक्क्यांनी वाढली आहे.

आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.57 टक्के घसरणीसह 914.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या आयटी कंपनीने आपले आर्थिक वर्ष 2022-23 मधील चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. आणि कंपनीने या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे.

आर्थिक तिमाही निकाल :
केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीची स्थिर चलन Q4FY 23 मध्ये 8.5 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या महसुलात 12 टक्क्यांची वाढ झाली असून महसूल 123.8 दशलक्ष डॉलर वर पोहचला आहे. तिमाही आधारावर कंपनीची रुपयातील महसूल 10.9 टक्क्यांनी वधारली आहे. महसूल वाढ आणि कार्यक्षमतेमुळे कंपनीचा EBITDA तिमाही आधारावर 19.1 टक्क्यांनी सुधारला आहे.

केपीआयटी टेक्नॉलॉजी आयटी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा विकास धोरणात्मक खाती मिडल वेअर आणि आर्किटेक्चर स्वायत्त आणि डायग्नोस्टिक्सद्वारे चालविला जात आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात किरकोळ वाढ झाली असून FY24 मध्ये कंपनीने महसूल वाढीचा अंदाज 27-30 टक्के आणि EBITDA मार्जिन 19-20 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

कंपनीचा खुलासा :
केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितले आहे की, कंपनीने सलग 11 तिमाहीपासून मजबूत महसूल आणि ऑपरेटिंग नफ्यात वाढ नोंदवली आहे. पुढील 3-4 वर्षांमध्ये कंपनी मजबूत मागणी आणि वाढीची अपेक्षा करत आहे. मजबूत वित्तीय डेटा आणि गुंतवणूक यामुळे कंपनीची तिमाही कामगिरी मजबूत राहिली आहे.

स्टॉकची कामगिरी : केपीआयटी टेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना उत्तम परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 33 टक्के परतावा मिळवला आहे. मागील एका वर्षभरात कंपनीच्या शेअर धारकांनी 58 टक्के नफा कमावला आहे. इतकेच नाही तर मागील तीन वर्षांत लोकांनी या स्टॉकमधून 2355 टक्के परतावा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPIT Technologies Share Price Today on 28 April 2023.

हॅशटॅग्स

KPIT Technologies Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x