
Tata Motors Share Price Today | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. यावेळी टाटा मोटर्स कंपनी उत्तम निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्हिसेस लिमिटेडने टाटा मोटर्स कंपनीचे सकारात्मक निकाल येतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
टाटा मोटर्स कंपनी आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 483.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, “जागतिक स्तरावर टाटा मोटर्स कंपनीचे तीनही व्यवसाय सकारात्मक रित्या रिकव्हर होताना दिसत आहेत. त्याच वेळी टाटा मोटर्स कंपनीचा भारतातील व्यवसाय नफ्याच्या ट्रॅकवर धावत आहे. हे संकेत टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकला चालना देण्यासाठी उपयोगी ठरतील. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची लक्ष किंमत 550 रुपये निश्चित केली आहे.
टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 485 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 494.50 रुपये होती. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एकेरी अंकी परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षाच्या कालावधीत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन आणि तीन वर्षात या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 25 टक्के आणि 85 टक्के वाढले आहेत.
तिमाही निकाल तपशील :
टाटा मोटर्स कंपनी आपले तिमाही आर्थिक 12 मे 2023 रोजी जाहीर करेल. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3043 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. मात्र एक वर्षभरापूर्वी याच काळात टाटा मोटर्स कंपनी तोट्यात होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.