19 May 2024 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

JSW Infra IPO | जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, IPO तपशील जाणून घेऊन गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा

JSW Infra IPO

JSW Infra IPO | जेएसडब्ल्यू ग्रुपचा भाग असलेल्या ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात लाँच होणार आहे. ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीने बुधवारी 2800 कोटी रुपये मूल्याच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा सादर केला आहे. या IPO इश्यू अंतर्गत कंपनी फ्रेश इश्यू करणार आहे.

‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीच्या सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू समूहाची बंदर व्यवसाय शाखा आयपीओद्वारे 2,800 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. IPO मधून मिळणारी रक्कम कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि व्यवसाय क्षमता विस्तार करण्यासाठी खर्च करणार आहे.

‘JSW इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनी ही JSW समूहाची सूचीबद्ध होणारी तिसरी कंपनी असेल. जानेवारी 2010 मध्ये JSW एनर्जी कंपनीची लिस्टिंग झाली होती. या IPO च्या माध्यमातुन JSW इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रवर्तक आपले भाग भांडवल कमी करणार नाहीत. जेएम फायनान्शिअल फर्मला IPO साठी प्रमुख बँकर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2021-22 या वर्षात कार्गो हाताळणी क्षमतेच्या बाबतीत ‘JSW इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनी भारतातील दुसरी सर्वात मोठी व्यावसायिक बंदर ऑपरेटर कंपनी ठरली होती. JSW समूहाचे अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत, त्यात जिंदाल शॉ, हेक्सा ट्रेडेक्स, जिंदाल स्टील, जिंदाल इन्फ्रा लॉजिस्टिक्स, जिंदाल स्टेनलेस जेएसडब्ल्य एनर्जी, जेएसडब्ल्य होल्डिंग्स यांचा समावेश आहे.

JSW इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे 31 डिसेंबर 2022 पर्यंत, ड्राय बल्क, ब्रेक बल्क, लिक्विड बल्क, गॅस आणि कंटेनरसह मल्टी-कमोडिटी कार्गोसाठी 153.43 दशलक्ष टन प्रतिवर्ष स्थापित कार्गो हाताळणी क्षमता होती. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पश्चिम आशियातील दोन मोठ्या बंदरांसाठी वार्षिक 41 MMT क्षमतेचा ऑपरेशन आणि व्यवस्थापन हाताळणी करार करणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| JSW Infra IPO ready to launch check details on 11 May 2023.

हॅशटॅग्स

JSW Infra IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x