
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी विल्मर’ कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान ‘अदानी विल्मर’ कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 410 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Adani Wilmar Share Price Today)
आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी ‘अदानी विल्मर’ कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 444.30 रुपये किमतीवर ट्रेड (Adani Wilmar Share Price NSE) करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या एका पॅनलने हिंडनबर्ग फर्मच्या आरोपावर अहवाल सादर केला असून, या अहवालात अदानी समूहाला क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळत आहे. तेजीच्या पार्श्वभूमीवर अनेक तज्ञांनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (Adani Wilmar Share Price BSE)
स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
केआर चोक्सी फर्मने अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्सवर 515 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी तत्काळ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने अदानी समूहा कंपनीच्या स्टॉकची लक्ष्य किमत 625 रुपये जाहीर केली आहे. नुवामा फर्मने 680 रुपयांवरून लक्ष्य किंमत कमी करून 625 रुपये केली आहे.
गुंतवणुकीवर परतावा : Adani Wilmar Share Price Return History
मागील एका वर्षाच्या कालावधीतकालावधीत ‘अदानी विल्मर’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिने, तीन महिने, आणि एक महिन्याच्या कालावधीत या कंपनीचे शेअर्स कमजोर झाले आहेत. 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 327 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 327 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची उच्चांक किंमत पातळी 841.90 रुपये होती.
मार्च तिमाहीची कामगिरी :
मार्च 2023 तिमाहीत अदानी विल्मर कंपनीच्या नफ्यात 60 टक्क्यांची घट झाली असून कंपनीने 93.61 कोटी रुपये नफा कमावला आहे. उत्पन्नात घट झाल्याने ‘अदानी विल्मर’ कंपनीचा नफाही घसरला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या मार्च तिमाहीत ‘अदानी विल्मर’ कंपनीने 234.29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
अदानी विल्मर शेअरची अंदाजित किंमत २०२५ – Adani Wilmar Share Price Prediction 2025