
Balaji Amines Share Price | ‘बालाजी अमाईन्स’ कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19 टक्क्यांच्या घसरणीसह 1872.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. ‘बालाजी अमाईन्स’ कंपनीच्या स्टॉक घसरणीचे कारण म्हणजे, कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी हेमंत रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी आपली उपकंपनी ‘बालाजी स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड’ च्या व्यवसायावर लक्ष देण्यासाठी राजीनामा दिला असल्याची माहिती सेबीला दिली आहे. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी ‘बालाजी अमाईन्स’ कंपनीचे शेअर्स 2.66 टक्के (Balaji Amines Share Price NSE) वाढीसह 2,225.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Balaji Amines Share Price BSE)
संचालनाचे राजीनामे :
‘बालाजी अमाईन्स’ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे स्वतंत्र संचालक नवीना थम्माशेट्टी चंद्रा, काशिनाथ रेवप्पा ढोले, सत्यनारायण मूर्ती चाळी, अमरेंद्र रेड्डी मिनुपुरी आणि विमला बेहराम मॅडॉन, यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांच्या मालिकेमुळे ‘बालाजी अमाईन्स’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1960.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
लाभांश तपशील :
बालाजी अमाईन्स कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांसह गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा देखील केली आहे. ‘बालाजी अमाईन्स’ कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 500 टक्के लाभांश देणार आहे. चौथ्या तिमाहीत बालाजी अमाईन्स कंपनीने 471.39 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 39.60 टक्के घट झाली आहे.
बालाजी अमाईन्स शेअरचा परतावा –
मागील 6 महिन्यांत ‘बालाजी अमाईन्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 23.81 टक्के घसरण झाली आहे.
बालाजी अमाईन्स शेअरची अंदाजित किंमत २०२५ – Balaji Amines Share Price Prediction 2025
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.