1 May 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा? Nippon India Mutual Fund | महिना SIP बचतीतून करोडमध्ये परतावा देत आहेत 'या' 8 योजना, पैशाने पैसा वाढवा Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी
x

Shreyas Shipping Share Price| 'श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स' कंपनीबाबत मोठी न्यूज आली, शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, सविस्तर माहिती जाणून घ्या

Highlights:

  • श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स शेअरची किंमत
  • डी-लिस्टिंगचा उद्देश :
  • कंपनीने निव्वळ नफा कमावला
Shreyas Shipping Share Price

Shreyas Shipping Share Price | ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीचे शेअर्स अप्रतिम तेजीत वाढत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 312.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 ऑगस्ट 2022 रोजी ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीचे शेअर्स 413 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 27 मार्च रोजी ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीचे शेअर्स 212.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स शेअरची किंमत
‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 24 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत डी-लिस्टिंगच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ ही कंपनी ‘ट्रान्सवर्ल्ड ग्रुप’ चा एक भाग आहे. मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीचे शेअर्स 4.15 टक्के वाढीसह 324.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डी-लिस्टिंगचा उद्देश :
‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ या कंपनीची प्रवर्तक कंपनी ‘ट्रान्सवर्ल्ड होल्डिंग्स लिमिटेड’ ने ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक’ मधील सार्वजनिक शेअर होल्डिंगचे सर्व भाग भांडवल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असे झाल्यास ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीचे इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमधून डी-लिस्ट होतील. जर ट्रान्सवर्ल्ड होल्डिंग्स लिमिटेड कंपनीने ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीचे सर्व सार्वजनिक भाग भांडवल खरेदी केले तर त्यांना कंपनीची संपूर्ण मालकी प्राप्त होईल.

31 मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी श्रेयस शिपिंग कंपनीचे 70.44 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत. सार्वजनिक शेअर होल्डिंगमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांनी 24.03 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. तर उर्वरित 5.53 टक्के भाग भांडवल अनिवासी भारतीय, कॉर्पोरेट संस्था आणि इतरांनी होल्ड केले आहे.

कंपनीने निव्वळ नफा कमावला
जानेवारी-मार्च तिमाहीत ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीने 18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 60 टक्क्यांची घसरण झाली आहे. एक वर्षभरापूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसुलात 29 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. कंपनीचा महसूल 115 कोटी रुपये वरुन घसरुन 81 कोटी रुपयेवर आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shreyas Shipping Share Price today on 23 May 2023.

हॅशटॅग्स

Shreyas Shipping Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x