
Stocks To Buy | मागील तीन-चार दिवसांपासून बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 63 हजारांचा विक्रमी टप्पा पार केल्यानंतर सेन्सेक्स 500 अंकांच्या घसरणीसह 62450 च्या पातळीवर आला होता. तर निफ्टी 18500 अंकावर ट्रेड करत होता. भारतीय शेअर बाजार सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ ट्रेड करत आहे.
मात्र कोणते शेअर्स खरेदी करावे याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी तज्ञांनी निवडलेले 3 स्टॉक घेऊन आलो आहोत. तज्ज्ञांच्या मते सध्या जर तुम्ही हे शेअर्स खरेदी केले तर तुम्हाला बंपर परतावा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.
Coal India Share Price
कोल इंडिया कंपनीच्या स्टॉकवर अनेक ब्रोकरेज फर्म तेजीत आहेत. CLSA ने कोल इंडिया स्टॉकवर 277 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर जेपी मॉर्गन फर्मने ओव्हरवेट रेटिंग देऊन स्टॉकवर 290 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी कोल इंडिया कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के घसरणीसह 229.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किंमत पातळीपेक्षा सुमारे 21 टक्क्यांनी अधिक आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 264 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 175 रुपये होती.
KNR Constructions Share Price
आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर, ब्रोकरेज फर्म शेअरखानने KNR Constructions कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.17 टक्के वाढीसह 249.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 301 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 281 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 201 रुपये होती. चौथ्या तिमाहीमध्ये या कंपनीने एकत्रित विक्रीत 13 टक्के वाढ नोंदवली आहे. तर निव्वळ नफ्यात एकूण 6 टक्के वाढ नोंदवली आहे.
NOCIL Share Price
NOCIL लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर ब्रोकरेज फर्मने 260 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के वाढीसह 224.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 295 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 200 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.