7 May 2025 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी हे दोन शेअर्स सुचवले, अल्पावधीत 25 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट प्राईस पहा

Highlights:

  • Stocks To Buy
  • तन्ला प्लॅटफॉर्म शेअरची टार्गेट प्राईस
  • हिंद रेक्टिफायर्स शेअरची टार्गेट प्राईस
Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात सकारात्मक ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. खास करून मिडकॅप निर्देशांकात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या चढ उतारामुळे निफ्टी मिडकॅप-100 मध्ये इंडेक्समध्ये तेजी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील 3-4 तिमाहींमध्ये म्हणजेच 9-12 महिन्यांत मिडकॅप निर्देशांकात 25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते या निर्देशांकाचे पुढील लक्ष्य 36600 असेल.

ग्लोब कॅपिटल मार्केट्स फर्मचे तज्ञ मिडकॅप निर्देशांकांमध्ये मजबूत कृती आणि मजबूत दृष्टीकोन व्यक्त करत आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांसाठी 2 मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत. तज्ञांनी एका स्टॉकमध्ये 1-3 महिन्यांसाठी आणि दुसऱ्यामध्ये 3-6 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. हे दोन स्टॉक तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. तज्ञांनी अल्प मुदतीसाठी हिंद रेक्टिफायर्स आणि तान्ला प्लॅटफॉर्म्स स्टॉक वर बाजी लावण्याचा सल्ला दिला आहे.

तन्ला प्लॅटफॉर्म शेअरची टार्गेट प्राईस

तज्ज्ञांनी तान्ला प्लॅटफॉर्म्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही एक कर्जमुक्त कंपनी असून क्लाउड कम्युनिकेशन क्षेत्रात व्यवसाय करते. मागील पाच वर्षांत कंपनीने कमावलेला नफा CAGR 90 टक्क्यांहून अधिक आहे. या कंपनीचा मागील दहा वर्षांचा सेल्स सीएजीआर 35 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तज्ञांनी या स्टॉकवर पहिला लक्ष्य 1000 रुपये आणि दुसरा लक्ष्य 1120 रुपये निश्चित केला आहे. आणि सोबत 650 रुपये किमतीवर क्लोजिंग स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

आज गुरूवार दिनांक 1 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.70 टक्के घसरणीसह 775.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1448 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 493 रुपये होती. तज्ञांनी हा स्टॉक पुढील 3-6 महिन्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

हिंद रेक्टिफायर्स शेअरची टार्गेट प्राईस

तज्ज्ञांनी अल्प मुदतीसाठी हिंद रेक्टिफायर्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 1 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 290.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी मुख्यतः पॉवर आणि सेमीकंडक्टर बनवण्याचे काम करते. कंपनी रेल्वे उपकरणे बनवण्याचे देखील काम करते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 322 रुपये आणि नीचांक पातळी किंमत 154 रुपये होती.

तज्ज्ञांनी हा स्टॉक 275-280 या रेंजमध्ये खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आणि 260 रुपयेवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी 340-350 रुपये हे अल्प मुदतीचे लक्ष्य निश्चित केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks To Buy for investment on 1 June 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या