
JP Power & JP Associates Stocks | जय प्रकाश पॉवर आणि जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर धारक मजबूत कमाई करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स सुसाट तेजीत धावत होते. जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर 11.37 टक्क्यांच्या वाढीसह 8.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 7.56 टक्क्यांच्या वाढीसह 6.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
शेअरची सध्याची किंमत
आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 6.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर जेपी असोसिएट कंपनीचे शेअर्स 3.61 टक्के घसरणीवसह 8.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स काल 7.33 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र काही तासात हा स्टॉक 13 टक्के वाढीसह 8.25 रुपये किमतीवर पोहचला होता. 12 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे स्टॉक 11.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला, आणि शेअरची किंमत 30 टक्क्यांनी घसरली होती.
शेअरची 52 आठवड्यांची पातळी
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 12.50 रुपये होती. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने लोकांना 9.59 टक्के परतावा कमावून दिला आहे.
शेअरची एकूण कामगिरी
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 रुपये किमतीवर ओपन झाले होते. 8 टक्क्यांच्या वाढीनंतर शेअरने 6.50 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. 20 डिसेंबर 2022 पासून या कंपनीचे शेअर्स हा 23 टक्क्यांनी कमजोर झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 9.45 रुपये होती. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने लोकांना 6.61 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.