Tata Group Share | गुंतवणूकदारांना 8300 टक्के परतावा देणाऱ्या टाटा एलेक्सी शेअरची जोरदार खरेदी सुरु, नेमकं कारण काय?
Highlights:
- Tata Group Share
- टाटा एलेक्सी शेअरची सध्याची किंमत?
- गगनयान मिशन डिटेल
- टाटा एलेक्सी स्टॉक कामगिरी

Tata Group Share | टाटा एलेक्सी या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8300 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आली आहे. टाटा एलेक्सी कंपनी आता ISRO च्या गगनयान मोहिमेमध्ये सामील होणार आहे. टाटा एलेक्सी ही जगातील एक आघाडीची अभियांत्रिकी कंपनी आहे.
टाटा एलेक्सी शेअरची सध्याची किंमत?
इस्रोच्या या अंतराळ मोहिमेसाठी Crew Module Recovery Models म्हणजेच CMRM डिझाइन आणि विकसित करण्यासाठी टाटा एलेक्सी कंपनीने आपले योगदान दिले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के वाढीसह 7,874.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गगनयान मिशन डिटेल
भारतीय अवकाश संशोधन संस्था गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. या मोहिमे अंतर्गत इस्रो प्रवाशांना पृथ्वीपासून 400 किलोमीटरपर्यंत अंतरावर घेऊन जाणार आहे. गगनयान या संपूर्ण मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा आणि रिस्की भाग म्हणजे प्रवाशांना सुरक्षित परत घेऊन येणे. त्यावर टाटा एलेक्सी कंपनी इस्रोला मदत करणार आहे.
टाटा एलेक्सी स्टॉक कामगिरी
7 जून 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 92.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 8300 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1.27 टक्क्यांच्या वाढीसह 7696.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12.62 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Group Share of Tata Elxsi share price today on 09 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA