
Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज 388 व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाला होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर मार्च २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. हे दर आता ७५ डॉलरवर आले असले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
देशातील आजचे दर
आज सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर आहे. या दराने पोर्ट ब्लेअरमध्ये तेल उपलब्ध आहे. तर, देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमध्ये आहे. दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.07 रुपये प्रति लीटर विकलं जातंय. ब्लूमबर्ग एनर्जीच्या म्हणण्यानुसार, ब्रेंट क्रूडचा ऑगस्ट फ्युचर्स प्राइस 75.53 डॉलर प्रति बॅरल आहे. डब्ल्यूटीआयचा जुलै चा वायदा भाव आता ७०.८८ डॉलर प्रति बॅरल आहे.
अनेक राज्यांमध्ये पेट्रोलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला
अनेक राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर विकले जात आहे. तेलंगणा, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, मणिपूर, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानया सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर आहे. तर ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात डिझेल १०० रुपयांच्या वर आहे.
सरकारी कंपन्यांचा जनतेला लुटण्याचा खेळ
कच्च्या तेलाचे दर जास्त असताना तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर १७.४ रुपये आणि डिझेलवर २७.७ रुपये प्रति लिटरचा तोटा झाला होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत जेव्हा किंमती थोड्या कमी झाल्या, तेव्हा तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर १० रुपये मार्जिन मिळाले, परंतु डिझेलवर सरकारी कंपन्यांना प्रति लिटर ६.५ रुपये तोटा झाला. त्यानंतर जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत पेट्रोलवरील सरकारी कंपन्यांचे मार्जिन 6.8 रुपये प्रति लिटरपर्यंत खाली घसरले, परंतु डिझेलवर सरकारी कंपन्यांना 0.5 रुपये प्रति लिटरचे सकारात्मक मार्जिन मिळाले आहे. तरी जनतेकडून पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून अधिक पैसा लुटला जातोय. त्याचा थेट परिणाम इतर प्रकारच्या महागाईवर देखील होतोय.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.