15 May 2024 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Madhya Pradesh Election | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद मोदींचे भोपाळमध्ये इव्हेन्ट, कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद

Madhya Pradesh Election 2023

Madhya Pradesh Election | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारी तीव्र केली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी भाजप २७ जून रोजी मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये जाऊन 10 लाखांहून अधिक कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करतील. त्याच दिवशी पंतप्रधान जबलपूर-इंदूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ही हिरवा झेंडा दाखवतील.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी.शर्मा म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा भोपाळमधील कार्यक्रम कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवेल. शर्मा म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडून रोड शोची ही विनंती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी धारला भेट देण्याची शक्यता आहे आणि मध्य प्रदेशात मोठ्या संख्येने असलेल्या सिकलसेल अॅनिमिया या आजारावरील कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

येत्या काही महिन्यांत मध्य प्रदेशात निवडणुका होणार आहेत, जिथे भाजप दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सरकार कोसळले आणि शिवराजसिंह चौहान यांना पुन्हा एकदा खुर्ची मिळाली होती. येथे मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे. यावेळी आम आदमी पक्षही जोर लावत आहे, मात्र तेथे आप पक्षाकडे यंत्रणा नसल्याने फायदा होणार नसल्याचं म्हटलं जातंय.

News Title : Madhya Pradesh Election 2023 PN Modi will virtually address the party karyakarta check details 15 June 2023.

हॅशटॅग्स

#Madhya Pradesh Election 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x