
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के घसरणीसह 74.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. झोमॅटो कंपनीचे शेअर्स मागील आठ दिवसाच्या सतत तेजीनंतर बुधवारी स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 78.28 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
12 जून 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर 80.30 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. झोमॅटो कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 40.55 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढीसह 75.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. Zomato कंपनीने जाहीर केले की त्यांनी Zomato ऑस्ट्रेलिया कंपनीची मॅन्युअली नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटो कंपनीने माहिती दिली की, 11 जून 2023 पासून Zomato Australia Pvt Ltd या उपकंपनीची ऑस्ट्रेलियामधील नोंदणी रद्द करण्यात आली आहे. झोमॅटो कंपनीने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती कळवली आहे.
शेअरची लक्ष किंमत
झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर काही तज्ञांनी 105 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 5 दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने झोमॅटो स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक105 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल फर्मने झोमॅटो शेअर्सवर 105 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर Emkay Financial फर्मने Zomato स्टॉकवर 90 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर 95 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. आणि नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर 94 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.