
Axita Cotton Share Price | ॲक्सिटा कॉटन या कापड व्यवसायात गुंतलेल्या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1300 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात ॲक्सिटा कॉटन कंपनीच्या शेअरची किंमत 2 रुपयेवरून वाढून 27 रुपये वर पोहचली आहे.
सिंगापूरस्थित परकीय संस्थागत गुंतवणूकदार नेव्ही कॅपिटल व्हीसीसी- नेव्ही कॅपिटल इमर्जिंग स्टार फंडने ॲक्सिटा कॉटन कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के घसरणीसह 26.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
परकीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक
एनएव्ही कॅपिटल कंपनीने ॲक्सिटा कॉटन कंपनीचे 1000000 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. NAV कॅपिटल ने ही गुंतवणुक 27.18 रुपये प्रति शेअर या किमतीवर केली आहे. कापूस उत्पादक आणि निर्यात व्यवसाय करणाऱ्या ॲक्सिटा कॉटन कंपनीने बायबॅकची घोषणा केली होती. 6 एप्रिल 2023 रोजी ॲक्सिटा कॉटन कंपनीला बांगलादेशच्या बादशाह टेक्सटाइल्स लिमिटेडकडून कच्च्या कापसाच्या पुरवठ्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरके एकूण मूल्य 26.93 कोटी रुपये आहे.
गुंतवणूकीवर परतावा
अवघ्या दोन वर्षात ॲक्सिटा कॉटन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना एक लाखावर 14 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. 9 जुलै 2021 रोजी ॲक्सिटा कॉटन कंपनीचे शेअर्स 1.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 जून 2023 रोजी हा स्टॉक 27.22 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
या काळात ॲक्सिटा कॉटन कंपनीच्या शेअरने 137 टक्के वाढ नोंदवली आहे. जर तुम्ही 9 जुलै 2021 रोजी ॲक्सिटा कॉटन कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.79 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.