
Cochin Minerals Share Price | कोचीन मिनरल्स अँड रुटाईल या विशेष केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कोचीन मिनरल्स अँड रुटाईल कंपनीच्या शेअरने लोकांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. मात्र काही महिन्यांपासून कोचीन मिनरल्स कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (Cochin Minerals Share)
दीर्घकाळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना इतका परतावा दिला की, लोकं करोडपती झाले आहेत. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी कोचीन मिनरल्स अँड रुटाईल कंपनीचे शेअर्स 1.63 टक्के घसरणीसह 299.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Cochin Minerals Share Price BSE)
शेअरची कामगिरी
शुक्रवारी कोचीन मिनरल्स अँड रुटाईल कंपनीचे शेअर्स 1.23 टक्क्यांच्या घसरणीसह 304.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कोचीन मिनरल्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 238.19 कोटी रुपये आहे. कोचीन मिनरल्स कंपनीने मागील 22 वर्षात आल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे.
30 मार्च 2001 रोजी कोचीन मिनरल्स कंपनीचे शेअर्स 2.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर शेअर 10764 टक्क्यांनी वाढून 304.20 रुपये किमतीवर पोहचला होता मागील 22 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.08 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे.
शेअरमधील उलाढाल
कोचीन मिनरल्स कंपनीच्या शेअरने केवळ दीर्घ मुदतीतच नाही, तर अल्पावधीत देखील गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील वर्षी 4 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 103 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 9 महिन्यांत हा स्टॉक 293 टक्क्यांनी वाढून 23 मे 2023 रोजी 405 रुपये किमतीवर पोहचला होता. आता या कंपनीच्या शेअरची किंमत विक्रमी उच्चांक किमतीच्या 25 टक्क्यांनी खाली आली आहे.
कंपनीचे तपशील
कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड ही उच्च दर्जाची सिंथेटिक रुटाइल बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी काच, पोर्सिलेन आणि मातीची भांडी इत्यादींमध्ये वापरले जाणारे टायटॅनियम ऑक्साईड बनवण्याचे काम करते. तसेच ही कंपनी एक्वा फेरिक क्लोराईडची भारतातील सर्वात मोठी उत्पादक म्हणून ओळखली जाते. फेरिक क्लोराईड वापर मुख्यतः पाणी शुद्ध करण्यासाठी होतो.
कंपनीचा प्लांट कोचीन बंदरापासून फक्त 15 किमी अंतरावर असलेल्या अड्यार औद्योगिक विकास क्षेत्रात स्थित आहे. जानेवारी-मार्च 2023 या तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 23 टक्क्यांची घसरण झाली असून, कंपनीचा निव्वळ नफा 16.81 कोटी रुपयेवरून घसरून 13 कोटीवर आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.