
Sheela Foam Share Price | शीला फोम कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी शीला फोम कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह पेक्षा 1,270 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शीला फोम कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका बातमीमुळे पाहायला मिळत आहे. शीला फोम कंपनी आपली प्रतिस्पर्धी कंपनी कर्ल ऑन एंटरप्रायझेस खरेदी करणार आहे, अशी बातमी शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे.
स्टॉकवाढीचे कारण
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शीला फोम कंपनीचे शेअर्स 1170.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शीला फोम कंपनी कर्ल ऑन एंटरप्रायझेस 3250 कोटी रुपयेला खरेदी करणार आहे. अशी बातमी एका मीडिया रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झाली. आणि शीला फोम कंपनीचे शेअर्स तेजीत आले. शीला फोम कंपनी प्रसिद्ध स्लीपवेल ब्रँडची मालक आहे. हा ब्रँड कर्ल ऑन कंपनीचा थेट प्रतिस्पर्धी मानला जातो. या डीलमुळे शीला फोम कंपनीचा व्यवसायातील वाटा दुप्पट होईल. पुढील काही महिन्यांत ही डील पूर्ण होऊ शकते.
शेअरची कामगिरी
शीला फोम कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 जून 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 712.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शीला फोम कंपनीचे शेअर्स 28 जून 2023 रोजी 1270 रुपयेवर क्लोज झाले होते. शीला फोम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1710 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 905.50 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.