15 May 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

पंतप्रधान मोदी खर्चिक इव्हेन्ट मार्केटिंगमधून लोकांमध्ये, तर राहुल गांधी थेट शेतात शेतकऱ्यांसोबत पेरणीला, नेटिझन्सकडून कौतुक

Rahul Gandhi

Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी दिल्लीहून शिमलाला रवाना झाले. त्यादरम्यान ते हरियाणातील सोनीपत येथे अचानक शेतकऱ्यांसोबत शेतात गेले. राहुल गांधी यांनी सर्वप्रथम मदिना येथील शेतात ट्रॅक्टरने नांगरणी केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसोबत भाताची पेरणी सुद्धा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भल्या पहाटे ही घटना घडताच स्थानिक वृत्तवाहिन्यांची आणि शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी जमा होऊ लागली होती.

भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी अलीकडच्या काही महिन्यांत अचानक अनेकदा काही ठिकाणी भेट दिली आहे. नुकतेच ते ट्रक चालकांसोबत प्रवास करताना दिसले होते आणि यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. विशेष म्हणजे एकाबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत खर्चिक इव्हेन्टमधून कॅमेरा स्वतःकडे केंद्रित ठेऊन दुरूनच लोकांशी संवाद साधत असताना राहुल गांधी थेट लोकांमध्ये सामान्य व्यक्तीप्रमाणे मिसळत असल्याने भाजप अधिक अडचणीत सापडत आहे. तसेच जनतेला राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील फरकही जाणवत आहे आणि त्याचे पडसाद समाज माध्यमांवर देखील उमटत आहेत.

तसेच काही वेळापूर्वी राहुल गांधी दिल्ली विश्वविद्यालयांच्या हॉस्टेलमध्ये पोहोचले होते. दिल्लीतील मुखर्जी नगर भागात त्यांनी यूपीएससीच्या उमेदवारांची ही भेट घेतली आणि संवाद साधला जो तरुणांना सुद्धा आवडला आहे. एकाबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इव्हेन्टमधील उपस्थितांना आधीच स्किप्टेड आणि कल्पना देण्यात आलेले प्रश्न विचारले जात असताना दुसरीकडे राहुल गांधी यांच्या मुक्त संवादात अशी कोणतीही बंधनं सामान्य लोकांवर नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राहुल गांधी यांचा भारत जोडो पार्ट टू सुरु होण्यापूर्वी भाजप लोकसभा निवडणूक घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय.

News Title : Rahul Gandhi Sonepat with farmers check details on 08 July 2023.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x