
Talbros Share Price | टॅल्ब्रोस लिमिटेड या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. स्टॉक मध्ये अचानक तेजीचे कारण म्हणजे, कंपनीला बऱ्याच नवीन ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत. शेअर बाजारात मजबूत चढ उतार असताना देखील टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
मागील 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 119 टक्के परतावा दिला
मागील चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 119 टक्के परतावा कमावून दिला आहे. एवढेच नाही तर या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ मुदतीत करोडपती बनवले आहे. डॉली खन्ना सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी देखील टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. डॉली खन्नाने टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीचे 14.9 कोटी रुपये मूल्याचे 1,85,715 इक्विटी शेअर्स धारण केले आहेत. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.80 टक्के वाढीसह 803.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
गुंतवणूकदार झाले करोडपती :
2023 च्या सुरवातीला टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 380.10 रुपये या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. 7 जुलै 2023 रोजी म्हणजेच अवघ्या चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 119 टक्क्यांच्या वाढीसह 832 रुपये विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले आहेत. प्रॉफिट बुकिंगमुळे स्टॉक किंचित खाली आला. 7 मार्च 2003 रोजी टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आता हा स्टॉक 803.20 रुपयेवर पोहचला आहे. मागील 20 वर्षांत टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11374 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.15 कोटी रुपये झाले आहेत.
टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअरने केवळ दीर्घ काळात नाही तर अल्प काळातही मोठा परतावा कमावून दिला आहे. 29 मार्च 2023 रोजी कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीला जगभरातून 400 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर्स मिळाले आहेत.
टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांच्या पुरवठ्यासाठी 205 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आणि पुढील 5-7 वर्षांसाठी टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीला गॅस्केट, हीट शील्ड, फोर्जिंग आणि चेसिस पुरवण्याची ऑर्डर देखील मिळाली आहे. टॅल्ब्रोस कंपनीने Marelli Talbros Chassis Systems या EV कंपनीसोबत 165 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे.
याशिवाय टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीने रिंग गियर, गियर प्लॅनेट, स्पेसर, ब्रेक पिस्टन, कव्हर किंग पिन, प्लॅनेटरी गियर, इत्यादींच्या पुरवठ्यासाठी मोठ्या निर्यातदार ग्राहकांसोबत 50 कोटी रुपये मूल्याचा पाच वर्षांचा व्यापारी करार केला आहे. पुढील पाच वर्षांसाठी हीट शील्ड उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीला काही देशांतर्गत कंपन्यांकडून 65 कोटी रुपयेची ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय पुढील 5 वर्षांच्या काळासाठी गॅस्केट उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी देशी-विदेशी निर्यातदार कंपन्यांकडून 120 कोटी रुपयेचे कंत्राट देण्यात आले आहे.
त्यामध्ये विदेशी ईव्ही कंपन्यांकडून मिळालेल्या 40 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर्स देखील सामील आहेत. टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत क्लायंट बजाज ऑटो, टाटा कमिन्स, व्होल्वो आयशर इंडिया, अशोक लेलँड, एस्कॉर्ट्स ग्रुप, फोर्स मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, होंडा आणि ह्युंदाई यासारखे दिग्गज कंपन्या सामील आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.