
Reliance Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कंपनीचे शेअर्स 4.50 टक्के वाढीसह 2755 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 18.50 लाख कोटी रुपयेवर पोहोचले आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. (Reliance Industries Share Price)
रिलायन्स कंपनीने आपला वित्तीय सेवा उपक्रम रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे नाव बदलून आता Jio Financial Services Limited असे ठेवण्यात येणार आहे. आज रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 2,752.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रिलायन्स कंपनी या विभाजनाची रेकॉर्ड तारीख म्हणून 1 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला होता. डिमर्जर झाल्यानंतर 20 जुलै 2023 रोजी Jio Financial Services या नवीन कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना वाटप केले जातील. रिलायन्स कंपनीच्या प्रत्येक शेअर होल्डरला मूळ कंपनीच्या प्रत्येक शेअरवर नवीन कंपनीचा एक शेअर मिळेल. मालमत्ता डेटा विश्लेषणाच्या आधारे Jio Financial Services ही कंपनी आपल्या ग्राहकांना आणि व्यवसायांना कर्ज देण्याचे काम करेल. नंतर कंपनी आपला व्यवसाय विमा, पेमेंट, डिजिटल ब्रोकिंग, मालमत्ता व्यवस्थापन, या क्षेत्रात देखील वाढवेल.
Jio Financial Services कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मुकेश अंबानी यांची कन्या ईशा आणि माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक राजीव महर्षी यांना नियुक्त करण्यात आला आहे. ईशा अंबानी यांची Jio Financial Services कंपनीच्या बिगर कार्यकारी संचालक म्हणून पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
रिलायन्स कंपनीचे कार्यकारी अंशुमन ठाकूर यांना देखील बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार माजी CAG राजीव महर्षी हे गृह सचिव पदावर देखील होते. आता त्यांना आरएसआयएलमध्ये पाच वर्ष कालावधीसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.