
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीच्या शेअर्सनी नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्के वाढीसह 1408.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स सलग चार दिवसांपासून हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. (Olectra Share Price)
मागील पाच दिवसात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 33.50 टक्के मजबूत झाले आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकडून 10,000 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.41 टक्के वाढीसह 1,319.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉक वाढीचे कारण :
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड आणि एनी ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कन्सोर्टियमला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या एसटी महामंडळाकडून LOI देण्यात आले आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, ही ऑर्डर एकूण खर्च कराराच्या आधारावर 5150 इलेक्ट्रिक बसेस संबंधित आहे. तसेच इलेक्ट्रिक आणि सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरचा पुरवठा, संचालन आणि देखभाल याचा देखील करारात समावेश करण्यात आला आहे.
एनी ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कडून इलेक्ट्रिक बस खरेदी करून 24 महिन्यांच्या कालावधीत एसटी महामंडळाला वितरित करेल. या कंत्राट कालावधीमध्ये सर्व बसेसच्या देखभालीचे काम करण्याची जबाबदारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कडे असेल.
3 वर्षात 1 लाखाचे झाले 23 लाख :
मागील 3 वर्षांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक नफा कमावून दिला आहे. 31 जुलै 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 58.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 10 जुलै 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 1408 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
या कालावधीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 2200 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 31 जुलै 2020 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23.98 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.