16 May 2024 11:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Income Tax Return | पगारदारांनो! इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी 31 तारखेपूर्वी महत्वाची अपडेट, या लोकांना दंड भरावा लागणार नाही

Income Tax Return

Income Tax Return | जर तुम्ही ही नोकरी करत असाल आणि अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरला नसेल तर तुमच्याकडे 21 दिवसांचा अवधी आहे. ३१ जुलैपर्यंत टॅक्स रिटर्न (आयटीआर) न भरल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत दोन कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे. (ITR Login)

11 जुलैपर्यंत 2 कोटी रिटर्न दाखल

प्राप्तिकर विभागाने मंगळवारी ट्विटरवर जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 2023-24 या मूल्यांकन वर्षासाठी 11 जुलैपर्यंत दोन कोटी आयकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी २० जुलैपर्यंत दोन कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली होती.

प्राप्तिकर विभागाने ट्विटमध्ये म्हटले..

प्राप्तिकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, करदात्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दोन कोटी नऊ दिवसांचा आकडा गाठला आहे. कर निर्धारण वर्ष २०२३-२४ चे विवरणपत्र अद्याप न भरणाऱ्यांना शेवटच्या क्षणी होणारी घाई टाळण्यासाठी लवकरात लवकर विवरणपत्र दाखल करण्यास कर विभागाने सांगितले आहे.

या लोकांना टॅक्स भरावा लागत नाही

नव्या कर प्रणालीनुसार सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. त्याचप्रमाणे जर कोणी जुनी करप्रणाली निवडली तर 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी ही सूट 2.5 लाख रुपये आणि 60 वर्षांवरील लोकांसाठी 3 लाख रुपयांपर्यंत आहे.

३१ जुलैपूर्वी भरा आयटीआर

यावेळी तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो. प्राप्तिकर विभागाकडून प्राप्तिकर दात्यांना सातत्याने जागरूक केले जात आहे. कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी वेळेत आयटीआर भरा, असे विभागाकडून सांगण्यात येते.

दंड कोणाला भरावा लागणार नाही?

आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंत तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 31 जुलैनंतर इन्कम टॅक्स भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. आपण भरलेल्या आयटीआरला शून्य (0) आयटीआर म्हटले जाईल.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Income Tax Return Last Date 31 July check details on 12 July 2023.

हॅशटॅग्स

#Income Tax Return(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x