4 May 2025 8:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

Vijay Kedia Portfolio | विजय केडीया यांची गुंतवणूक असलेला एलेकॉन इंजीनियरिंग शेअर तुफान तेजीत, असा फायदा घ्यायला विसरू नका

Vijay Kedia Portfolio

Vijay Kedia Portfolio | शेअर बाजारात आपल्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आणि मल्टीबॅगर कमाईसाठी प्रसिद्ध असलेले दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांची गुंतवणुकदार असलेल्या एका स्टॉकने अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले आहेत.

आता ही कंपनी आपले कर्ज परतफेड करत आहे. कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 800 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी एलेकॉन इंजीनियरिंगकंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 724.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. विजय केडिया यांची गुंतवणूक असलेल्या एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीच्या शेअर्सने 748 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. दिवसा अखेर एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 14.33 टक्के वाढीसह 722 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीने मजबूत त्रैमासिक निकाल घोषित केले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत, एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीचा एकूण सेल्स 26 टक्क्यांच्या वाढीसह 325 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या काळात कंपनीने 61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

एलेकॉन इंजीनियरिंग कंपनी 1960 साली स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यत मटेरियल हाताळणी, उपकरणे, डिझाइन आणि निर्मिती व्यवसायात गुंतली आहे. एलेकॉन इंजीनियरिंगकंपनीचे एकूण बाजार भांडवल 8000 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. जून 2023 पर्यंत विजय केडीया यांनी एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीचे 1.78 टक्के भाग भांडवल धारण केले होते. 27 नोव्हेंबर 2020 रोजी एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीच्या शेअर्स 36 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 20 पट अधिक वाढली आहे. जर तुम्ही 12 जुलै 2022 रोजी एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 322 रुपये किमतीवर खरेदी केले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 124 टक्के वाढले असते. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 134.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षात 400 टक्के आणि 3 वर्षात 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vijay Kedia Portfolio stock of Elecon Engineering share Price today on 13 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vijay Kedia Portfolio(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या