
Multibagger Stock | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही जॅश इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे.
पाच वर्षात गुंतवणुकदारांना 1100 टक्के परतावा दिला
मागील पाच वर्षाचा डेटा पाहिला तर तुम्हाला समजेल की या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 जुलै 2023 पर्यंत कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 736 कोटी रुपये होता. मागील 3 वर्षांत तर गुंतवणूकदारांचे पैसे 10 पट वाढले आहेत. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के वाढीसह 1,239.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जॅश इंजिनियरिंग ही कंपनी मुख्यतः फॅब्रिकेटेड गेट्समध्ये व्यवहार करते. जॅश इंजिनिअरिंग कंपनी आपल्या ग्राहकांसाठी स्टेनलेस स्टील, सुपर डुप्लेक्स, कार्बन स्टील, वॉटर रेझिस्टंट आणि पॉवर जनरेटिंग मशिन्स यांसारखे साहित्य बनवण्याचे काम करते.
तब्बल 75 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली
जॅश इंजिनियरिंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला जून 2023 या महिन्यात तब्बल 75 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. 40 कोटी रुपयांची ऑर्डर भारतीय कंपन्यांकडून आणि 35 कोटी विदेशी कंपन्यांकडून मिळाली आहे. जॅश इंजिनियरिंग कंपनीला संगम पॉवर प्रोजेक्ट्स हैदराबाद, जेडब्ल्यूआयएल नवी दिल्ली, कल्पतरू पॉवर मुंबई आणि रॅमकी इन्फ्रा हैदराबाद यांसारख्या कंपन्याकडून ऑर्डर देण्यात आले आहेत. याशिवाय कंपनीला हाँगकाँग आणि अमेरिकेतूनही मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत.
ऑर्डर बुकचा आकार 736 कोटी रुपये
1 जुलै 2023 पर्यंत जॅश इंजिनियरिंग कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 736 कोटी रुपये होता. ज्यापैकी 232 कोटी रुपयेची ऑर्डर भारतीय मार्केटमधून आणि 500 कोटी रुपयेची ऑर्डर परकीय देशातील मार्केटमधून मिळाली आहे. जॅश इंजिनियरिंग कंपनी पाणी, सांडपाणी, हायड्रो वॉटर, स्टॉर्म वॉटर, पॉवर, स्टील, सिमेंट, पेपर, पेट्रोकेमिकल आणि खतांचे प्लांट बनवण्याचे काम देखील करते.
जॅश इंजिनियरिंग कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1472 कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्षात आणि मार्च 2023 तिमाहीमध्ये कंपनीने उत्कृष्ट आर्थिक निकाल जाहीर केले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जॅश इंजिनियरिंग स्टॉक 1248 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. मागील 3 वर्षात जॅश इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.