 
						Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स या वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना प्रचंड प्रॉफिट कमावून दिला आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षात 22 रुपयेवरून वाढून 160 रुपयेवर पोहचले आहेत. जीनस पॉवर कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Genus Share Price)
जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 179.80 रुपये होती. तर जीनस पॉवर शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 72.55 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 4.26 टक्के घसरणीसह 165.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
3 वर्षात 1 लाखावर 7 लाख रुपये परतावा :
31 जुलै 2020 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 जुलै 2023 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 163.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कालावधीत जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना 645 टक्के नफा कमावून दिला आहे.
जर तुम्ही 31 जुलै 2020 रोजी जीनस पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7.44 लाख रुपये झाले असते. सिंगापूर स्थित सोवरेन फंड कंपनी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या नवीन स्मार्ट मीटरिंग सोल्यूशन्स व्हेंचर्समध्ये 2 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करून 74 टक्के हिस्सा धारण करणार आहे. तसेच या स्मार्ट मीटरिंग सोल्यूशन्स प्लॅटफॉर्मवर सिंगापूर स्थित सोवरेन फंडचे नियंत्रण आणि अधिकार राहील. तर जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचा हिस्सा 26 टक्के असणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		