
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही महिन्यापासून जबरदस्त रॅली पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
यासह ही कंपनी आपले शेअर्स देखील विभाजित करु शकते. हे महत्त्वाचे निर्णय कंपनी 2 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या घेण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.28 टक्के वाढीसह 88.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कंपनीबद्दल माहिती :
नुकताच सेबीला दिलेल्या माहिती सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजित करणार आहे, आणि कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला जाणार आहे. ही बातमी जाहीर होताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 10 टक्क्यांची उसळी घेतली होती. या कंपनीचे शेअर्स सध्या 100 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारी हा स्टॉक 88.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या FMCG कंपनीच्या शेअरने माहोल एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 22.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक वर्षभरापूर्वी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 52.38 टक्के वाढले आहे. मागील सहा महिन्यात हा कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 1.38 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.