
Reliance Power Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. मात्र आता स्टॉकमध्ये सुधारणा होत आहे. अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 6 सप्टेंबर 2022 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 24.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मे 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मात्र या किमतीपासून स्टॉक 98 टक्के कमजोर झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 16.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर कंपनीचे कर्ज परतफेड करून अधिग्रहण करण्याच्या शर्यतीत चार दिग्गज कंपन्याचे नाव पुढे येत आहे. या 4 कंपन्या दिग्गज कंपन्या म्हणजे आदित्य बिर्ला ARC, Reliance ARC, Rare ARC आणि Varde Partners यांची मालकी असलेली ARC इंडिया या कंपन्या आहेत. CFM ARC कंपनीने या पूर्वीच विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर कंपनीच्या कर्जफेडीसाठी 1220 कोटी रुपये संपूर्ण रोख रकमेची ऑफर जाहीर केली होती. तर Varde Partners यांच्या ARC इंडिया कंपनीने याआधीच 1260 कोटी रुपयेची वनटाइम सेटलमेंट ऑफर जाहीर केली होती. मात्र कंपनीच्या कर्जदात्यांनी ही ऑफर फेटाळली.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर होल्डर्सची ई-व्होटिंग प्रक्रिया 24 जुलै 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात रिलायन्स पॉवर कंपनीने आपल्या शेअर धारकांना ई-मेल आणि संदेशही पाठवून सूचना दिली आहे. ही मतदान प्रक्रिया 27 जुलै 2023 पर्यंत चालू राहणार आहे. या कालावधीत कंपनीच्या सार्वजनिक शेअर धारकांना कंपनीशी संबंधित समस्यांवर मतदान करण्याचा विशेष अधिकार असेल.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार जून 2023 तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकांनी 24.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर उर्वरित 75.01 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे आहे. अनिल अंबानी यांच्या कुटुंबाकडे रिलायन्स पॉवर कंपनीचे 93,12,62,920 शेअर्स आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.