
E2E Networks Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखली ट्रेड करत होते. तर छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मागील पाच दिवसांत E2E नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 39.21 टक्के नफा कमावून दिला आहे. (E2E Share Price)
17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 169.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या पाच दिवसांत शेअरची किंमत 264.50 रुपयेवर पोहचली. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी E2E नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.48 टक्के वाढीसह 264.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ज्या गुंतवणूकदारांनी पाच दिवसांपूर्वी E2E नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.40 लाख रुपये झाले आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 60 टक्क्यांनी वाढली आहे. 13 एप्रिल 2022 पासून आतापर्यंत E2E नेटवर्क्स लिमिटेड स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना प्रती शेअर 125 रुपयेपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 81 टक्क्यांनी वाढली आहे.
E2E नेटवर्क कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 278.15 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 164.05 रुपये होती. मागील एका वर्षात E2E नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 68.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीतील शेअर पॅटर्ननुसार, E2E नेटवर्क्स लिमिटेड कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 59.71 टक्के भाग भांडवल धारण केलं आहे. मागील 4 तिमाहीपासून कंपनीच्या परकीय गुंतवणूकदारांनी 1.66 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपल्या भाग भांडवल 15.01 टक्केवरून विकून 12.98 टक्के केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.