18 May 2024 9:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Maan Aluminium Share Price | लॉटरीच लागली! मल्टिबॅगर मान अॅल्युमिनियम शेअरवर फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिटचा फायदा

Maan Aluminium Share Price

Maan Aluminium Share Price| मान अॅल्युमिनियम कंपनीच्या शेअर धारकांसाठी खुश खबर आहे. मान अॅल्युमिनियम कंपनीच्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स मिळणार आहेत. तसेच ही कंपनी आपले शेअर्स स्प्लिट देखील करणार आहे. नुकताच पार पडलेल्या बैठकीत मान अॅल्युमिनियम कंपनीच्या संचालक मंडळाने इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासह कंपनीने गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकून 353.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस आणि स्टॉक स्प्लिट तपशील :

मान अॅल्युमिनियम कंपनीने आपले शेअर्स 1 : 2 या प्रमाणात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच प्रत्येक शेअरवर कंपनी एक शेअर मोफत देणार आहे. बोनस शेअर्सची बातमी जाहीर होताच सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मान अॅल्युमिनियम कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 354.05 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मान अॅल्युमिनियम कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 1 इक्विटी शेअरचे 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 2 इक्विटी शेअर्समध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.

रेकॉर्ड तारीख डिटेल :

मान अॅल्युमिनियम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात रेकॉर्ड तारखेपर्यंत स्टॉक असेल, अशा गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा फायदा मिळणार आहे. मान अॅल्युमिनियम कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून 27 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. मान अॅल्युमिनियम ही कंपनी मुख्यतः ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, एअर कंडिशनिंग, बांधकाम उद्योगांसाठी विविध उत्पादने बनवण्याचे काम करते. मागील एका वर्षभरात मान अॅल्युमिनियम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 171.90 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 108.62 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Maan Aluminium Share Price today on 26 July 2023.

हॅशटॅग्स

Maan Aluminium Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x