16 May 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण?
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव सुसाट, सोनं खरेदीच्या विचारात असणारे विचारात पडतील, आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर आता या सोनं-चांदीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या या वाढीमुळे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन महिन्यांत सोने निच्चांकी पातळीवर गेले नव्हते, पण आता गेल्या काही दिवसांपासून त्यात वाढ होताना दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 61700 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. चांदीच्या दरांनी सुद्धा 77,200 रुपये प्रति किलोच्या पातळीवर झेप घेतली होती. (Gold Price Today)

सोने आणि चांदीच्या दरात आठवडाभर घसरण

तेजीनंतर मे महिन्यातील आठवडे सोने-चांदीत घसरण दिसून आली. याचा परिणाम असा झाला की, सराफा बाजारात सोने घसरले आणि गेल्या दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले. 30 जून रोजी सोनं 58027 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचलं होतं. तर चांदीचा दर घसरून 68429 रुपये प्रति किलोग्राम वर आला होता. परंतु १५ दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आता किमती विक्रमी पातळीपासून थोड्या दूर जात आहेत.

सराफा बाजारात सोन्याचा दर किती झाला?

सराफा बाजारातील दराची माहिती देणाऱ्या https://ibjarates.com अधिकृत संकेतस्थळावर दररोज सोने-चांदीचे दर जाहीर केले जातात. सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. आज सोमवारी सोन्याचा 14 रुपयांनी वाढून 59505 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 141 रुपयांनी वाढून 73,561 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीचे भाव घसरले

सराफा बाजारात तेजी पाहायला मिळत असली तरी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आज सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोने 128 रुपयांनी घसरून 59657 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 169 रुपयांनी घसरून 73890 रुपये प्रति किलोझाली. तत्पूर्वी शुक्रवारी एमसीएक्सवर दोन्ही धातूंमध्ये तेजी दिसून आली. या वाढीसह शुक्रवारी सोने 59785 रुपये आणि चांदी 74059 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर :

* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : 55250 रुपये, २४ कॅरेट सोने : 60280 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 55280 रुपये, 24 कॅरेट सोने : 60310 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : 55250 रुपये, २४ कॅरेट सोने : 60280 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 55280 रुपये, 24 कॅरेट सोने : 60310 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 55250 रुपये, 24 कॅरेट सोने : 60280 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : 55250 रुपये, २४ कॅरेट सोने : 60280 रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : 55280 रुपये, २४ कॅरेट सोने : 60310 रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : 55250 रुपये, २४ कॅरेट सोने : 60280 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : 55250 रुपये, २४ कॅरेट सोने : 60280 रुपये
* ठाणे – २२ कॅरेट सोने : 55250 रुपये, २४ कॅरेट सोने : 60280 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 31 July 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x