
RVNL Share Price | सध्या शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये देखील तुफान खरेदी पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 1088 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे. यासह भारत सरकार देखील रेल विकास निगम लिमिटेड कंपनीमधील आपला वाटा कमी करणार आहे. (Rail Vikas Nigam Share Price)
त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्टॉक वाढीच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 125.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 1 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तिप्पट नफा कमावून दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहेत. भारतीय शेअर बाजारात अस्थिरता असूनदेखील हा स्टॉक कमालीची कामगिरी करत आहे.
भारत सरकारने रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे तब्बल 78 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्यापैकी सरकारने 3.4 टक्के स्टेक विकण्यासाठी ऑफर फॉर सेल जाहीर केली होती. याशिवाय केंद्र सरकारला 1.6 टक्के अतिरीक्त स्टेक विकून आपला कंपनीतील वाटा कमी करायचा आहे. भारत सरकारने नुकताच ऑफर फॉर सेल अंतर्गत आपले शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूकदरांनी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यात कमाल उत्सुकता दाखवली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला नुकताच हरियाणा रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 1088 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली होती. मागील 1 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 290 टक्के नफा कमावून दिला आहे.
21 ऑक्टोबर 2022 रोजी, या कंपनीचे शेअर्स 36 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 125 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 27 मार्च 2020 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.75 रुपये या किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 10 पट वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.