
TIL Share Price | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स निर्देशांक 2.17 टक्क्यांनी वाढला आहे. या काळात त्यात 1410 अंकांची वाढ पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 66620 अंकावर पोहचला होता. शेअर बाजारातील तेजीच्या काळात अनेक शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देत आहेत. मागील एका महिन्यात टीआयएल लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
शेअरची कामगिरी :
मागील एका महिन्यात टीआयएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 157 टक्के परतावा कमावून दिला आहे. काल या कंपनीचा शेअर 277.35 रुपये किमतीवर पोहचला होता. आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी टीआयएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 277.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 156.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. टीआयएल लिमिटेड या कंपनीची स्थापना 1974 साली झाली होती. टीआयएल लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 264.95 कोटी रुपये आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. मागील पाच दिवसांत टीआयएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 22.72 टक्के नफा कमावून दिला आहे.
शेअर किंमत इतिहास :
टीआयएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 156.92 टक्के वाढवले आहे. जर तुम्ही एक महिनाभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.57 लाख रुपये झाले असते. एक महिनाभरापूर्वी टीआयएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 107.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 57.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 191.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 32.20 टक्के वाढले आहेत. टीआयएल लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 277.35 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 81.76 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.