
Power Grid Share Price | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोसळले होते. मात्र आज हा स्टॉक किंचित प्रमाणात सावरला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये ही पडझड जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्या पाहायला मिळाली. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील वीज पारेषण कंपनीच्या नफ्यात 5 टक्के घसरण झाली आहे. जून तिमाहीत या कंपनीने 3,597.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
पॉवर ग्रीड कंपनीने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेबीला कळवले की, वित्त खर्चात वाढ झाल्याने कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने 3,801.29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स ट0.40% क्के घसरणीसह 250.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीचे स्पष्टीकरण :
जून 2023 तिमाहीत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या महसुलात किरकोळ वाढ झाली असून कंपनीने 11,257.60 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 11,168.54 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचा वित्त खर्च एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत वाढून 2,057.23 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीचा वित्त खर्च 1,959.70 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून 2023 तिमाहीत कंपनीचा भांडवली खर्च 1,506 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने आपल्या उपकंपन्यांच्या साहाय्याने 4,435 मेगा व्होल्ट अँपिअर क्षमतेची वाढ केली आहे. POWERGRID कंपनीची एकूण वीज पारेषण क्षमता 1,74,625 सर्किट किमी होती.
बोनस शेअर्स तपशील :
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअर धारकांना 1 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना प्रत्येक तीन शेअर्सवी एक बोनस शेअर मोफत मिळणार आहे. बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 25 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
पॉवर ग्रिड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 25 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. यासह संचालक मंडळाने बोर्डाने 2024-25 या आर्थिक वर्षात अनेक टप्प्यात खाजगी प्लेसमेंटला मान्यता दिली आहे. संचालक मंडळाने देशांतर्गत बाजारातून रोख्यांच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची तयारी सुरू केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.