
GG Engineering Share Price | GG इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. या स्मॉल कॅप पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स काल 12 टक्के वाढीसह 1.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक अफाट तेजीत वाढत होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, या कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपये पेक्षा कमी आहे. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी GG इंजिनियरिंग कंपनीचे शेअर्स 18.64 टक्के वाढीसह 1.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
स्टॉक वाढीचे कारण :
GG इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये इतकी सुसाट तेजी पाहायला मिळत आहे, कारण कंपनीला नवीन ऑर्डर मिळाली आहे. GG इंजिनियरिंग या स्मॉल कॅप कंपनीला भारतातील एका मोठ्या उद्योग समूहाकडून लोखंडी कच्चा माल पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य तब्बल 21 कोटी रुपये आहे.
GG इंजिनियरिंग कंपनीने सेबीला ऑर्डरबद्दल माहिती देताना कळवले की, “GG इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीला ही माहिती कळवताना अतिशय आनंद होत आहे की, भारतातील एका मोठ्या उद्योग समूहाकडून लोखंडी कच्चा माल पुरवण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 21 कोटी रुपये आहे.
GG इंजिनियरिंग कंपनीने नुकताच राइट्स इश्यू अॅलोटमेंट द्वारे भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. GG इंजिनियरिंग कंपनीने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 49,88,20,215 शेअर्स 1 रुपये दर्शनी किमतीवर वाटप केले. या कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 38.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3.16 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 0.74 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.