
Balu Forge Share Price | बालू फोर्ज या कंपन्यांच्या शेअरनी मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत बालू फोर्ज कंपनीच्या निव्वळ नफ्यात प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 182.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी बालू फोर्ज कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 181.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बालू फोर्ज कंपनीची तिमाही कामगिरी :
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत बालू फोर्ज कंपनीने 10.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 34.50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी जून तिमाहीत बालू फोर्ज कंपनीने 10.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एप्रिल ते जून 2023 या तिमाही कालावधीत कंपनीने 69.77 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील 6 महिन्यांत बालू फोर्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 117.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात कंपनीचे शेअर्स 85 रुपयेवरून वाढून 184 रुपयेवर पोहचले होते. सहा महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणूकदारानी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहेत.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील बालू फोर्ज कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. आशिष कचोलिया यांनी बालू फोर्ज कंपनीचे 2.23 टक्के भाग भांडवल म्हणजेच जवळपास 21,65,500 शेअर्स धारण केले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 194 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.