19 May 2024 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत घसरले, पटापट तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि सराफा बाजारामध्ये आज सोनं स्वस्त झालं आहे. आज सोन्याचा भाव 58500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली आला आहे.

आज एमसीएक्स’वर सोने-चांदीच्या दरात किती घसरण झाली?

मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर आज सोन्याचा भाव 0.40 टक्क्यांनी घसरून 58,449 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय चांदीचा भावही 0.01 टक्क्यांनी घसरून 69714 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 58476 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58836 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने प्रति दहा ग्रॅम ३६० रुपयांच्या घसरणीसह उघडले आहे.

सोनं उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?

सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 3,109 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर, चांदीचा भाव 69840 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 70241 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो ४०१ रुपयांची घसरण झाली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे?

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव

मुख्य शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,250 रुपये, मुंबईत 54,100 रुपये, कोलकातामध्ये 54,100 रुपये, लखनऊमध्ये 54,250 रुपये, बंगळुरूमध्ये 54,100 रुपये, जयपूरमध्ये 54,250 रुपये, पाटणामध्ये 54,150 रुपये आहे.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर:

* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54130 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54130 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 54130 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54100 रुपये, 24 कॅरेट सोने : 59020 रुपये

खरेदी करण्यापूर्वी हे तपासा

तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता की ते खरे की नकली. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Update check details on 17 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(216)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x