18 May 2024 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये काल अप्पर सर्किट, सध्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या चढ-उताराचे कारण काय?

Brightcom Share Price

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. शेअरची किंमत देखील 26.51 रुपयेवर पोहोचली होती. (Brightcom Group Share Price)

Brightcom Group Share Price

आज मात्र ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. एकूणच जगभरातील शेअर बाजार आज घसरल्याने अनेक शेअर्समध्ये तीच स्थिती आहे. नुकताच कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.46 टक्के (Brightcom Share Price NSE) घसरणीसह 25.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Brightcom Share Price BSE)

जून तिमाहीत ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीने मागील वर्षाच्या जून तिमाहीच्या तुलनेत 15.96 टक्के वाढीसह 321.48 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जून 2022 तिमाहीमध्ये कंपनीने 277.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 तिमाहीत ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या विक्रीतही जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. जून तिमाहीत कंपनीची विक्री 14.16 टक्के वाढीसह 1,690.32 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.

जून 2022 मध्ये ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीची विक्री 1480.61 कोटी रुपये नोंदवली गेली होती. जून 2023 मध्ये ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचा EBITDA 14.49 टक्के वाढीसह 518.19 कोटी रुपयेवर पोहचला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 452.61 कोटी रुपये होता.

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचा ईपीएस जून 2023 मध्ये 1.37 टक्केवरून वाढून 1.59 रुपयेवर पोहचला आहे. ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 5.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 38.86 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. म्हणजेच याकाळात गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावा लागला आहे.

मागील पाच वर्षात ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 1,209.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 49.05 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,293.01 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Share Price today on 18 August 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x