
IRFC Share Price | IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर मध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.66 टक्के घसरणीसह 48.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मीडिया रिपोर्ट नुसार भारत सरकार इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीतील आपले काही शेअर्स विकणार आहेत.
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या भारतीय रेल्वेद्वारे संचालित कंपनीमध्ये भारत सरकारने 86.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. भारत सरकार 2023-24 या चालू आर्थिक वर्षात ऑफर फॉर सेल अंतर्गत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स विकण्याचा विचार करत आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 46.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
भारत सरकारच्या एक वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश असलेल्या आंतर-मंत्रालय गटाने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर विक्रीचे प्रमाण ठरवण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. सेबीच्या किमान सार्वजनिक शेअर होल्डिंग नियमानुसार भारत सरकारला इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीचे 11.36 टक्के भाग भांडवल कमी करावे लागणार आहे.
MPS नियमांनुसार, एखादी कंपनी जेव्हा शेअर बाजारात सूचीबद्ध होते, तेव्हा कंपनीच्या प्रवार्तकांना पाच वर्षांच्या आत किमान 25 टक्के शेअर होल्डिंग कमी करावी लागते. कंपनीच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार “प्रमाण निश्चित करण्यापूर्वी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांचे हित जपण्याचा प्रयत्न करत आहे.” सध्याच्या बाजार मुल्यानुसात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या 11.36 टक्के शेअर्सचे मूल्य 7,600 कोटी रुपये होते.
ब्रोकरेज फर्म प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, “भारतीय रेल्वेतर्फे देण्यात आलेल्या नवीन वॅगन ऑर्डरमुळे IRFC कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत होती. मात्र प्रदीर्घ रॅलीनंतर आता कंपनीच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आहे. कोणत्याही नकारात्मक ट्रिगर शिवाय गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स विकायला सुरुवात केली आहे.
IRFC कंपनीच्या शेअरमध्ये 48 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांनी सध्या हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. कारण कंपनीच्या शेअरची दीर्घ कालीन कामगिरी खूप चांगली राहणार आहे.
मागील एका महिन्यात शेअरने 52 टक्के परतावा दिला
मागील एका महिन्यात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 71.83 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50.15 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात शेअरने 132 टक्के परतावा दिला
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 132 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 52.71 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 20.55 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 64,532.28 कोटी रुपये आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचा IPO 2021 साली 26 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.