
REC Share Price | आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 236.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या सरकारी कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे.
याच कालावधीत सेन्सेक्समध्ये 0.5 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 233.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
आरईसी लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची 100 वी सर्वात जास्त बाजार भांडवल असलेली कंपनी आहे. या कंपनी शेअर्समधील जबरदस्त वाढीमुळे ही कंपनी भारतातील 100 सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे. सध्या आरईसी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल.61,735 कोटी रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही कंपनी बाजार भांडवलामध्ये 100 वी सर्वोच्च मूल्य असलेल्या कंपनीच्या यादीत आली होती.
REC Ltd कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेला बाजार भांडवलामध्ये मागे टाकले आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. तर कंपनीच्या शेअरच्या किमती 107 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत या सहा महिन्यांत कंपनीच्या स्थितीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 105.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 122.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 44.04 टक्के वाढली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 235.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.