20 May 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Aeroflex Industries IPO | आला रे आला IPO आला! एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, शेअर प्राईस बँड तपासून घ्या

Aeroflex Industries IPO

Aeroflex Industries IPO | सध्या तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस नगा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. आजपासून म्हणजेच मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 पासून एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO मध्ये तुम्ही 24 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या IPO संबंधित रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस नुसार, ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 162 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारी विकणार आहे. (Aeroflex Share Price)

एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या IPO चा आकार 351 कोटी रुपये आहे. एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी आपल्या IPO मध्ये फ्रेश शेअर्स सोबत ऑर्डर फॉर सेल अंतर्गत देखील काही शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग सकारात्मक होण्याचे संकेत मिळत आहेत.

एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 58 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर या कंपनीचे शेअर्स अप्पर किमतीवर वाटप करण्यात आले तर शेअर 166 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. IPO इश्यूच्या माध्यमातून एयरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक असलेले SAT Industries आणि Italika Global FZC आपल्या मालकीचे 1.75 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला मागील आठवड्यात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने IPO लाँच करण्याची परवानगी दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aeroflex Industries IPO details on 22 August 2023.

हॅशटॅग्स

Aeroflex Industries IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x