11 May 2024 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Suraj Industries Share Price | अबब! हा शेअर खरेदी करणाऱ्यांना कुबेर पावला! 3 वर्षात 10,844 टक्के परतावा मिळाला, करोडपती झाले

Suraj Industries Share Price

Suraj Industries Share Price | सूरज इंडस्ट्रीज लिमिटेड या खाद्यतेल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 158.78 कोटी रुपये आहे. मागील 3 वर्षात सूरज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

3 वर्षात 10,844 टक्के परतावा दिला

अवघ्या तीन वर्षात सूरज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 10,000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी सूरज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 10.57 टक्क्यांच्या वाढीसह 129.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सूरज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के वाढीसह 132 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

19 ऑगस्ट 2020 रोजी सूरज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात शेअरची किंमत 10,844.92 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी सूरज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10,844.92 टक्के वाढून 1 कोटी 8 लाख रुपये झाले असते.

मागील एका महिन्यात सूरज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15.26 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 13.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 3.32 टक्के वाढली आहे.

सूरज इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः खाद्यतेल उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी खाद्यतेल आणि वनस्पति तूप ‘आंगन’ या ब्रँड अंतर्गत विकते. आणि सूरज इंडस्ट्रीज ही कंपनी ओल्ड मंक रम या ब्रँड नावाने अल्कोहोल देखील विकते. यासह सूरज इंडस्ट्रीज कंपनी रिअल इस्टेट व्यवसायात देखील सक्रिय व्यवसाय करत आहे. या कंपनीची स्थापना 1992 साली उत्तर प्रदेश राज्यात नोएडा या ठिकाणी झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suraj Industries Share Price today on 26 August 2023.

हॅशटॅग्स

#Suraj Industries Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x