 
						Dr Reddys Lab Share Price | डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 2005 मध्ये डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीचे शेअर्स 350 रुपये पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत होते. 13 मे 2005 रोजी डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीचे शेअर्स 334.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2009 मध्ये या कंपनीचे शेअर्स पहिज्यांदा 1000 रुपये किमतीवर पोहोचले होते. आणि 2013 मध्ये या कंपनीने पहिल्यांदा 2000 रुपये किंमत स्पर्श केली होती. शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 5,576.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होत.
2014 साली डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 3000 रुपये किमतीवर पोहचले होते. आणि 2015 मध्ये या कंपनीचे शेअर्स 4000 रुपये किमतीवर पोहचले होते. 2005 ते 2015 या काळात डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीचे शेअर्स अनेक पट वाढले आहेत. 2015 नंतर हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात आला होता. आणि 2017 नंतर शेअरची किंमत 2000 रुपयेच्या खाली आली होती. यांनतर 2020 मध्ये डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीच्या शेअरने पहिल्यांदा 5000 रुपयेच्या पार गेली होती.
1 सप्टेंबर 2023 रोजी डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीचे शेअर्स 5575 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर हा स्टॉक 5989.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 3997 रुपये होती. मागील 18 वर्षांत डॉ रेड्डीज लॅबोरेटरी कंपनीच्या शेअरची किंमत 350 रुपयेवरून वाढून 5500 रुपयेवर पोहचली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		