16 May 2024 7:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

IDFC First Bank Share Price | हे काय राव? IDFC फर्स्ट बँक FD वर व्याज 6%, शेअरने 6 महिन्यांत दिला 63% परतावा, पुढची टार्गेट प्राईस पहा

IDFC First Bank Share Price

IDFC First Bank Share Price | आयडीएफसी फर्स्ट बँक या खाजगी क्षेत्रातील बँकचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 95.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एका परकीय गुंतवणूकदार संस्थेने आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये यूएस स्थित इन्व्हेस्टमेंट फर्म GQG Partners ने ब्लॉक डील अंतर्गत आयडीएफसी फर्स्ट बँकचे 6.4 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. ही डील 89 रुपये प्रति शेअर किमतीवर झाली आहे.

GQG पार्टनर्स फर्मने 1 सप्टेंबर 2023 रोजी खुल्या बाजारातून IDFC फर्स्ट बँकेचे 2.6 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉक 1.42 टक्के वाढीसह 99.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी GQG पार्टनर फर्मने IDFC फर्स्ट बँकेचे 2.6 टक्के भाग भांडवल 1,527 कोटी रुपये किमतीला खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. GQG Partners कंपनीने दोन फंडांच्या माध्यमातून आयडीएफसी फर्स्ट बँकेतील शेअर्स खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. GQG Partners Emerging Markets Equity Fund ने आयडीएफसी फर्स्ट बँकचे 6.38 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. आणि Goldman Sachs GQG Partners International Opportunities Fund ने आयडीएफसी फर्स्ट बँकेचे 10.77 कोटी शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले आहेत.

या शेअर्सचे प्रमाण बँकेच्या एकूण पेड-अप इक्विटी कॅपिटलच्या 2.6 टक्के आहेत. या दोन्ही संस्थांनी आयडीएफसी फर्स्ट बँकचे शेअर्स 89 रुपये किमतीवर खरेदी केले होते, त्याप्रमाणे त्यांनी एकूण 1,527.26 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

परकीय गुंतवणूकदार क्लोव्हरडेल इन्व्हेस्टमेंट फर्मने या डीलमध्ये शेअर्स विकले होते. त्यांनी खुल्या बाजारात 27.87 कोटी शेअर्स म्हणजेच बँकेचे 4.2 टक्के भाग भांडवल 89 रुपये किमतीवर विकले होते. या विक्रीतून क्लोव्हरडेल इन्व्हेस्टमेंट फर्मने 2,480.34 कोटी रुपये प्रॉफिट बुक केला आहे. जून 2023 पर्यंत क्लोव्हरडेल फर्मकडे IDFC फर्स्ट बँकेचे 47.17 कोटी शेअर्स म्हणजेच 7.12 टक्के स्टेक भाग भांडवल होते.

भारतातील दिग्गज ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉकवर 100 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.आयडीएफसी फर्स्ट बँक स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 63.08 टक्के नफा मिळवून दिला आहे. याच कालावधीत बेंचमार्क निफ्टी-बँक इंडेक्समध्ये फक्त 7.46 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IDFC First Bank Share Price today on 05 September 2023.

हॅशटॅग्स

#IDFC First Bank Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x