
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये लक्षणीय विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. सोमवारी देखील हा स्टॉक अप्पर सर्किटसह 18.85 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.
प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात शुक्रवारी सुभाष चंद्रा आणि जैसी फ्लॉवर यांच्याबद्दल आलेल्या बातमीमुळे येस बँकेचे शेअर्स तेजीत वाढत होते. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.69 टक्के घसरणीसह 18.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
तज्ञांनी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, येस बँकेच्या थकबाकी कर्जात 75 टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणून आता सुभाष चंद्रा यांना त्यांनी घेतलेल्या 6500 कोटी रुपये कर्जऐवजी 1500 कोटी रुपये थकबाकी भरावी लागणार आहे. मात्र हे 1500 कोटी रुपये एकाच भरण्याचे आदेश सुभाष चंद्रा यांना देण्यात आले आहे. मागील काही वर्षापासून येस बँक आपल्या थकीत कर्जाची वसुली करु न शकल्याने आर्थिक संकटात सापडली आहे.
चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स टेक्निकल चार्ट पँटर्नवर सकारात्मक दिसत आहेत. पुढील काळात हा स्टॉक 22 रुपये ते 24 रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 18.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांनी स्टॉक खरेदी करताना 16.50 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
शेअर बाजारात स्टॉक जेवढ्या वेगात वाढतो, तेवढ्याच वेगात तो खाली देखील येतो. म्हणून नेहमी गुंतवणूक करताना स्टॉप लॉस लावून आपले नुकसान नियंत्रित करणे खूप महत्त्वाचे असते. मागील काही काळात येस बँकेच्या शेअरने काही खास कामगिरी केलेली दिसत नाही. सहा महिन्यात येस बँक स्टॉक फक्त 7.10 टक्के वाढला आहे. आणि एका वर्षात या बँकेच्या शेअरची किंमत 8.06 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.