21 May 2024 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Chavda Infra IPO | आला रे आला IPO आला! चावडा इन्फ्रा IPO शेअरची प्राईस बँड 60 ते 65 रुपये, GMP पहा, मजबूत परतावा मिळेल

Chavda Infra IPO

Chavda Infra IPO | सध्या जर तुम्ही IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गुजरात स्थित चावडा इन्फ्रा कंपनी 12 सप्टेंबर 2023 रोजी आपला IPO लाँच करणार आहे. हा IPO 14 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी ओपन असेल. चावडा इन्फ्रा कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 60 ते 65 रुपये निश्चित केली आहे. या IPO मध्ये कंपनी 66.56 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते चावडा इन्फ्रा कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. चावडा इन्फ्रा कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 27 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.

IPO मधून जमा होणारी रक्कम कंपनी आपल्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी, तसेच सामान्य कॉर्पोरेट उद्देशांकरता, आणि IPO इश्यूसाठी खर्च करणार आहे.

चावडा इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः गुजरात राज्यात निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांचे बांधकाम आणि विकास व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीने आपल्या IPO पैकी अर्धा म्हणजे 31.6 लाख शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत.

एकूण 15 टक्के कोटा उच्च नेटवर्थ असलेल्या गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत. उर्वरित 35 टक्के कोटा म्हणेजच 22.12 लाख शेअर्स कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Chavda Infra IPO details on 06 September 2023.

हॅशटॅग्स

Chavda Infra IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x