20 May 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Thali Price Hike | मतदारांचं अभिनंदन! सामान्य जनतेच्या शाकाहारी थाळीच्या दरात 24 टक्के, मांसाहारी थाळीच्या दरात 13 टक्क्यांनी वाढ

Thali Price Hike

Thali Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने अनेक विक्रम मोडले आहेत. सामान्य लोकांच्या खिशात पैसा टिकत नसून तो त्यांच्या दैनंदिन वस्तूंच्या खर्चात कमी पडत आहे. दुसरीकडे, दिल्लीत G२० च्या नावाने सुरु असलेल्या मोदी ब्रॅण्डिंगसाठी तब्बल ४००० कोटी खर्च केले जात असून तिथे जेवणासाठी सोन्या-चांदीची भांडी रचण्यात आली आहेत. मात्र सामान्य लोकांशी संबंधित थाळी अत्यंत महाग झाली आहे.

मे महिन्यापासून सलग तीन महिने टोमॅटोचे दर चढे असल्याने ऑगस्ट महिन्यात शाकाहारी थाळीच्या दरात २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या तुलनेत शाकाहारी थाळीची किंमत २४ टक्क्यांनी महाग झाली आहे. तर मांसाहारी थाळीच्या दरात वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने दोन्ही प्रकारच्या थाळ्या स्वस्त होण्याची शक्यता आहे.

शाकाहारी जेवणाची थाळी झाली महाग

क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सच्या मासिक ‘रोटी राईस रेट’ अहवालानुसार ऑगस्ट २०२३ मध्ये शाकाहारी थाळीच्या किंमतीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच ३०० रुपयांना मिळणारी शाकाहारी थाळी ऑगस्टमध्ये वाढून ३७२ रुपये झाली आहे. मात्र, जुलैच्या तुलनेत हा खर्च काहीसा कमी झाला आहे.

मांसाहारी थाळीच्या दरात 13 टक्क्यांनी वाढ

या अहवालात म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये शाकाहारी थाळीच्या दरात महिन्याच्या आधारावर किंचित घट झाली आणि चालू आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा वार्षिक आधारावर वाढ झाली, याचे मुख्य कारण टोमॅटोचे दर मजबूत झाले आहेत. मात्र, मांसाहारी थाळीच्या दरात वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच ३०० रुपयांना मिळणारी मांसाहारी थाळी ऑगस्टमध्ये ३३९ रुपये झाली आहे.

शाकाहारी थाळीच्या दरात २४ टक्के वाढ झाली असून त्यापैकी २१ टक्के वाढ एकट्या टोमॅटोच्या किमतीमुळे झाली असून, ऑगस्टमध्ये ती १७६ टक्क्यांनी वाढून १०२ रुपये प्रति किलो झाली आहे. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा दर ३७ रुपये किलो होता.

सप्टेंबरमध्ये थाळी स्वस्त होण्याची शक्यता

टोमॅटोचे किरकोळ दर महिन्याच्या आधारावर ५१ रुपये किलोपर्यंत खाली आल्याने सप्टेंबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही थाळींचे दर कमी होऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे. तसेच १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत सप्टेंबरमध्ये १,१०३ रुपयांवरून ९०३ रुपयांवर आली आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक दिलासा मिळू शकतो.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Thali Price Hike Thali food price hike due to tomatoes check details on 09 September 2023 Marathi news.

हॅशटॅग्स

#Thali Price Hike(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x