19 May 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

RVNL Share Price | RVNL आणि IRFC शेअरची गाडी कुठल्या दिशेने? या 2 शेअर्ससह श्रीमंत करतील अशा शेअर्सची यादी सेव्ह करा

RVNL Share Price

RVNL Share Price | सध्या शेअर बाजारात मोजक्याच शेअरचा बोलबाला चालू आहे. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स, रेल विकास निगम या सारखे शेअर्स सामील आहेत. या कंपन्याच्या शेअर नी अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के ते 411 टक्के परतावा कमावून दिला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स एका वर्षापुर्वी 428.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 2219 रुपये किमतीवर पोहचला आहे.

RVNL शेअर

मागील एका वर्गात रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 370 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 सप्टेंबर 2022 रोजी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात हा स्टॉक 378 टक्क्यांच्या वाढीसह 162.75 रुपये किमतीवर पोहचला आहे. मात्र आज मंगळवारी RNVL शेअर 6.09% घसरीसह 177.95 रुपयांवर ट्रेड करत आहे.

IRFC शेअर

त्याचप्रमाणे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या.गुंतवणूकदारांना 237 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स एका वर्षात 22.95 रुपयेवरून वाढून 77.40 रुपयेवर पोहचले आहेत.

Fertilisers And Chemicals Travancor शेअर

गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देणाऱ्या स्टॉकमध्ये Fertilisers And Chemicals Travancore कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 123.90 रुपयेवरून वाढून 518.65 रुपयेवर पोहचली आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 308.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 564 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 104 रुपये होती. ज्या गुंतवणूकदाराने एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 4 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत.

जिंदाल स्टील शेअर्स

गुंतवणूकदारांना एका वर्षात मजबूत परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये जिंदाल स्टील कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 271 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 132.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 492 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 494 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 130 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 12 September 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x